ऑनलाईन मागवली बिर्याणी, पण चिकन बिर्याणीमध्ये सापडली मेलेली पाल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

नवाबांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैदराबादमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. त्याठिकाणची चिकन बिर्याणी खूप फेमस असून, तीच बिर्याणी मागवण एका इसमाला खूप महागात पडलं आहे. भूक लागली म्हणून एका इसमाने झोमॅटोवरून चिकन बिर्याणी मागवली, थोड्याच वेळात ती घरी आली. पण जेव्हा त्या व्यक्तीने पॅकेट उघडलं, तेव्हा समोरच दृश्य पाहून तो घाबरलाच, कारण पॅकेटमध्ये बिर्याणीमध्ये त्याला चक्क मेलेली पाल दिसली.

 

बिर्याणीत पाल सापडल्याने माजला गदारोळ
हैदराबादमधील डीडी कॉलोनी येथे राहणाऱ्या इसमाने बावर्ची हॉटेलमधून ऑनलाईन चिकन बिर्याणी मागवली होती. पण पार्सल उघडल्यानंतर त्या बिर्याणीमध्ये मेलेली पाल सापडल्याने घरातील सगळेच हैराण झाले. हॉटेलच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी सोशल मीडियावरही पोस्ट केली. असा अनुभव आल्यानंतर पुढल्या वेळेस ऑनलाइन जेवण मागवण्याआधी ते किमान १० वेळा तरी विचार करतील.

Leave A Reply

Your email address will not be published.