नाशिकच्या लाचखोर तहसीलदाराकडे मोठी संपत्ती असल्याचा संशय, वाचा सविस्तर  

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क 

घराच्या बाजूला १५ लाख रुपयांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात रंगेहात सापडला. त्यावेळी एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलं. तहसीलदारांच्या घरी चौकशी केली असता. त्यांच्याकडे ४ लाख ८० हजारांची रोकड आणि ४० तोळे सोने आढळले. एसीबीच्या त्या तहसिलदारी कसून चौकशी करीत असून त्यांच्याकडे लाखो रुपयांचा भूखंड असल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितली आहे. त्या तहसीलदाराचं नाव नरेशकुमार बहिरम असं आहे. तेव्हापासून तेव्हापासून तहसीलदारांना एसीबीने ताब्यात घेतलं आहे. तेव्हापासून चौकशी सुरु आहे. भूखंड सापडल्याने अजून संपत्ती असल्याचा संशय एसीबीच्या अधिकाऱ्यांना आहे.

नाशिकचे लाचखोर तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्या मालमत्तेची एसीबीकडून कसून चौकशी सुरु आहे. लाचखोर तहसिलदारांकडे आणखी १५ लाखांच्या मालमत्ता असल्याचं समोर येत आहे. सध्याच्या चौकशीत धुळे जिल्ह्यात एक भूखंड असल्याचं समोर आलं आहे.

तहसिलदार बहिरम यांच्या बँक खाती आणि लॉकर्सचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास सुरु केला आहे. सध्या सुरु असलेल्या चौकशीत सुध्दा मोठी मालमत्ता हाती लागण्याची शक्यता एसीबीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.