मजुरांना घेऊन जाणारी गाडी घाटात उलटली, 2 महिलांचा मृत्यू, 11 जखमी

0

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क

मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीचा खोकसा घाटात अपघात झाला. या अपघातात 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाले आहे. अपघातग्रस्त वाहनाखाली दाबले गेलेल्या मुजरांना पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. पिकअप गाडी वरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

या पिक अप व्हॅनमध्ये सर्व बांधकाम मजूर होते. बांधकाम मुजरीसाठी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातून परत येत असताना रात्री उशिरा हा अपघात झाला आहे. जखमींवर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.