नंदुरबार मध्ये कोरोनाचा कहर, आरोग्य यंत्रणा सक्रिय

0

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात पाच दिवसात करोनाचे पाच रुग्ण आढळून आले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली आहे. जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांना देखील कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. नंदूरबार जिल्हा परिषदेतील एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर कार्यालयात खळबळ उडाली होती. त्यानंतर, पुन्हा चार रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची डोकेदुखीही वाढली आहे. कोरोना पुन्हा सक्रीय झाल्यामुळे चाचणी वाढवणे गरजेचे झालं आहे, तर दुसरीकडे तापमान बदलामुळे सर्वत्र सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोनवर मात करण्यासाठी अधिक तयारी करून ठेवली आहे. मात्र रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ

ज्याप्रमाणात वातावरणात बदल होत आहे, त्यामुळे सुद्धा संसर्गजन्य रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मागच्या तीन वर्षात आपण जी काळजी घेतली होती. त्याचपद्धतीची काळजी घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. कारण कोरोना पुन्हा सक्रीय झाल्यामुळे अनेकांनी त्याची धास्ती घेतली आहे. त्याचबरोबर कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.