म्हसावद येथे वृद्धाला दोन जणांनी विनाकारण झोडपले !

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
दुचाकी लावू नका इतके म्हटल्याचा राग येऊन दोन जणांनी दर्ग्यात काम करणाऱ्या वृद्धाला शिवीगाळ करून झोडपून काढल्याची घटना म्हसावद येथे घडली असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला संबंधित दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे

म्हसावद येथे हजरत जलालोद्दीन बाबाचा दर्गा आहे याठिकाणी ताज मोहम्मद शेख वय ६९ हे काम करतात. या दर्ग्यावर १० मार्च रोजी म्हसावद गावातील अशोक रामचंद्र भाईजी व दिलीप पाटील हे दोघे आले, ते दर्ग्यासमोर दुचाकी लावत असतांना, ताज शेख यांना दोघांना याठिकाणी दुचाकी लावू नका असे सांगितले, त्याचा राग आल्याने अशोक भाईजी व दिलीप पाटील या दोघांनी ताज शेख यांना शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी ताज शेख यांनी मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अशोक रामचंद्र भाईजी व दिलीप पाटील दोन्ही रा. म्हसावद या दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक स्वप्निल पाटील पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.