संजय राऊतांनी नौटंकी थांबवा !

लहान कार्यकर्त्यांसारखे..; नाना पटोले संतापले

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. काँग्रेस आणि शरद पवार गट यांचे मत विचारात न घेता ठाकरे गटाने थेट या ठिकाणी आपला उमेदवार जाहीर केल्याने दोन्ही गटांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यामध्ये ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात सध्या वाद प्रतिवाद सुरु आहेत. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘संजय राऊत नौटंकी थांबवा, लहान कार्यकर्त्यांसारखं वक्तव्य करु नका’, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

नाना पटोले म्हणाले, “संजय राऊतांनी मर्यादा पाळावी, त्यांनी आपली नौटंकी बंद करावी, ते ठाकरे गटाचे मोठे नेते आहेत. संजय राऊत यांनी लहान कार्यकर्त्यांसारखे वागू नये, दोन दिवसात सांगलीचा प्रश्न सामोपचाराने सोडवू. मात्र, त्यांनी लहान कार्यकर्त्यासारखं बोलू नये”, असा सल्ला पटोलेंनी राऊतांना दिला आहे.

पुढे ते म्हणाले, “लोकशाही विरोधातील भाजपचे सरकार हे कशाही प्रकारे सत्येत यायला नको, यासाठी आम्ही कोणतेही परिणाम भोगायला तयार आहोत, अशी भूमिका आम्ही स्पष्ट सांगितलेले आहे, असे असतानाही लहान कार्यकर्त्यासारखे वक्तव्य करावे हे न पटण्यासारखे आहे, म्हणून त्यांनी त्यामध्ये सुधार करावा. सामंजस्याने मार्ग काढण्याची आमची भूमिका आहे. अशा पद्धतीचे वक्तव्य मोठ्या नेत्याने करु नये”, असंही नाना पटोले यांनी म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.