बॉक्स उघडला अन् निघाले ‘हत्ती’, रेल्वेस्थानकात उडाली खळबळ

0

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सगळीकडे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रेल्वे स्थानकात देखील चेकिंग होत आहे. सामना घेऊन येणाऱ्या मालवाहू गाडीमध्ये चेकिंग सुरू असताना मेटल डिटेक्टर वेगळ्या आवाजाने वाजला आणि पोलिसांसह प्रशासकीय यंत्रणेची धाकधूक वाढली. यामुळे यंत्रणा सतर्क झाली आणि १५ डब्यामध्ये असलेल्या सगळ्याच पार्सलमधून असा आवाज येत असल्याने शंका निर्माण झाली.

लोहमार्ग पोलीस, बॉम्ब पथक, तपास यंत्रणा अशा सगळ्यांनी प्रत्येक डबे उघडून त्यामध्ये श्वानपथक सोडले. श्वानपथकाने खोक्यात वेगळं काहीतरी असल्याचे संकेत दिले. त्यानंतर हे खोके उघण्याचा निर्णय घेतला. हे बॉक्स उघडून पाहिले आणि चक्रावले.  दोन तास हा सगळा प्रकार सुरू होता. बॉम्ब शोधक पथकाला याची माहिती देण्यात आली. यामुळे रेल्वे स्थानकात खळबळ उडाली. कारण या बॉक्समधून हत्ती निघाले.

या हत्तींनी यंत्रणेची झोप उडवली. प्रत्येक डब्यात मेटलचा एक फुटाचा हत्ती होता. हे हत्ती मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये तयार करण्यात आले होते. दक्षिण एक्स्प्रेसने त्यांना नागपूर रेल्वे स्थानकात त्यांना पोहोचवलं. त्यानंतर ते मुंबईच्या दिशेनं रवाना होणार होते. मात्र नागपूर रेल्वे स्थानकात तपासणीदरम्यान मेटल डिटेक्टर वेगळा वाजला आणि पार्सल फोडण्यात आलं. या सगळ्या प्रकारामुळे पोलीस आणि तपास यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. या सगळ्या घटनेनंतर वाटाघाटीही झाली. दोन तास कसून तपासणी झाल्यानंतर या हत्तींपासून धोका नाही हे सिद्ध झाल्यावर हत्ती मुंबईच्या दिशेनं रवाना करण्यात आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.