धनंजय मुंडेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे.

धनंजय मुंडे रात्री साडेबाराच्या सुमारास सागर या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीचं कारण आणि भेटीमधील तपशील अद्याप कळू शकलेला नाही. धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात.

गेल्या काही दिवसांपासून राजकारणात एकापाठोपाठ एक ट्विस्ट पाहायला मिळत होते. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव जाहीर केल्याने सर्वांना मोठा झटका बसला.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी रात्री साडेबारा वाजता देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचं समजतं. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांची भेट घेणं याची चर्चा सुरु झाली आहे. धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट होती का, या भेटीत नेमकं काय घडलं, हे तर येणाऱ्या वेळेत समजेल.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी माहिती दिली की, “नव्या सरकारमध्ये हे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. फडणवीस आणि धनंजय मुंडे हे भाजप युवा मोर्चामध्ये एकत्र होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी सागर बंगल्यावर गेले असावेत. त्यामध्ये दुसरं काही कारण असणं गरजेचं नाही. धनंजय मुंडे हे आमचे ज्येष्ठ सहकारी आहे. विधानसभेत प्रमुख तोफ म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे बघतो. धनंजय मुंडे मुळातूनच भाजपकडून आले आहेत. त्यामुळे त्यांचे संबंध असणं आणि त्यांनी भेट घेणं स्वाभाविक आहे.”

 

Leave A Reply

Your email address will not be published.