धक्कादायक: पोलिसाने विवाहित महिला कर्मचाऱ्यावर केला अत्याचार 

खोटे सांगून उकळले 19 लाख रुपये 

0

नवी मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

 

महिला अत्याचाराचे दिवसेंदिवस प्रमाण वाढतच आहे. त्यातच महिलांच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या पोलीस विभागातच महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार झाल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय ? 

पंतनगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या 32 वर्षीय पोलिसाने त्याच ठिकाणी काम करणाऱ्या विवाहित महिला कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवलं. प्रेमसबंध जुळवून नवी मुंबईतील सानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रूमवर नेऊन तब्बल 2 वर्ष शारीरिक संबंध जुळवून तिच्याकडून खोटे सांगून 19 लाख रुपये उकळले. आरोपी पोलिसाने तिला नवरा सोडून देण्यास सांगितले. तसे न केल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. घेतलेल्या पैशापैकी 14 लाख 61 हजार परत केले. मात्र, अनेकवेळा त्याने तिला खोटे बोलून आणि जिवे मारण्याची धमकी आणि लग्नाचे आमिष दाखवून तिचे सानपाडा येथील रूमवर शारीरिक शोषण केले.

 

सदर प्रकरणात पंतनगर पोलीस ठाण्यात झिरो एफआयआर दाखल झाल्याने ती सानपाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. सानपाडा पोलिसांनी संबधित पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून सानपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.