मुंबई पोलिसांची गुजरातमध्ये मोठी कारवाई… तब्बल इतका माल हाती…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

मुंबई अंमली पदार्थविरोधी पथकाच्या वरळी युनिटने (worli unit) गुजरातमधील (Gujrat) भरूच (Bharuch) जिल्ह्यातील अंकलेश्वर भागात एका ड्रग्ज फॅक्टरीचा (drug factory) पर्दाफाश केला आहे. या छाप्यात जवळपास 1 हजार 26 कोटी रुपये किमतीचे सुमारे 513 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात पथकाला यश आलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची मागणी आहे. याप्रकरणी एका महिलेसह 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याआधी मे 2022 मध्ये 56 किलो तर जुलै 2022 मध्ये 75 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्याचबरोबर गेल्या वर्षी सप्टेंबर 2021 मध्येही गुजरातमधील मुंद्रा बंदरावर 3,000 किलो ड्रग्जची खेप पकडली गेली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 21,000 कोटी असल्याचे सांगण्यात आलं. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) अफगाणिस्तानमधून आयात केलेल्या दोन कंटेनरमधून 3,000 किलो हेरॉईन जप्त केलं होतं. या प्रकरणी चेन्नई इथून दोघांना अटक करण्यात आली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.