ब्रेकींग.. हिंदुस्तानी भाऊला मुंबई पोलिसांनी केली अटक

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत अफवा पसरवणाऱ्या हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठकविरोधात धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

आज हिंदुस्थानी भाऊला बांद्रा कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे.

दरम्यान काल (३१ जानेवारी) युट्युबर विकास फाटक उर्फ हिंदुस्तानी भाऊने परीक्षेबाबत अफवा पसरवल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केली. विद्यार्थ्यांच्या या गोंधळामुळे बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला होता. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाईन व्हाव्यात म्हणून आंदोलन केली.

दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत असे म्हटले आहे, मात्र सोशल मीडियावर दहावी आणि बारावीची परीक्षा राज्य सरकार ऑनलाईन घेणार आहे अशी अफवा ‘हिंदुस्थानी भाऊ’ ऊर्फ विकास पाठक तरुणाने पसरली होती. याचा परिणाम म्हणजे काल राज्यभर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.

हिंदुस्थानी भाऊने आम्हाला बोलावले असून त्यांनीच आंदोलनासाठी निर्धार केल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले. त्यामुळे या गोंधळाचा मुख्य सूत्रधार हिंदुस्थानी भाऊला अटक करण्यात आली आहे. आज त्याला बांद्रा कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे.

हिंदुस्थानी भाऊने व्हिडिओत काय म्हटले?

दोन वर्षांत कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचे देखील मृत्यू झाले आहेत. या धक्क्यातून कुटुंब अजून सावरलेले नाही. आता ओमिक्रॉन आला आहे. स्वतः सरकार म्हणतेय की घरात राहा, काळजी घ्या. मग सरकार विद्यार्थ्यांचा बळी का देत आहे? प्रोफेसर ऑनलाइन बैठक घेत आहेत. तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी आहे, तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ का? असा सवाल हिंदुस्थानी भाऊने त्याच्या व्हिडिओतून केला होता.

वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण

दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात कुणीतरी खोटी बातमी पसरवली होती. विद्यार्थी, पालक आणि शाळांनी त्यावर विश्वास ठेऊ नये. परीक्षा ज्या तारखेला आहेत त्याच तारखेला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहोत असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.