जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जळगाव जिल्ह्यात मागील चोवीस तासात तब्बल 153 बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर 646 जणांनी कोरोनावर मात केलीय. होम आयसोलेशन केलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 2494 इतकी आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी दर 98.18% इतका आहे. तर आज एक कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालाय.
असे आढळले बाधित
जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण 153 कोरोना रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात 14, जळगाव ग्रामीण 05 , भुसावळ 14, अमळनेर 13 , चोपडा 20 , पाचोरा 02, एरंडोल 14, जामनेर 8, पारोळा 01, चाळीसगाव 18, मुक्ताईनगर 20 आणि इतर जिल्ह्यातील 1 .