मुंबई इंडियन्समध्ये हार्दीक स्वागत, पंड्याची घरवापसी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

आयपीएल २०२४ ला सुरुवात झाली आहे. आणि मुंबई इंडियन्समध्ये आवडता खेळाडू हार्दिक पंड्या पुन्हा परतला आहे. रविवारी सर्व खेळाडू रिटेन आणि रिलीज केले होते. पंड्याला गुजरात संघाने रिलीज केलं नव्हतं, मात्र सोशल मीडियावर हार्दिक मुंबई कडून खेळणार असल्याचं व्यायरल झालं होत. मुंबईन हार्दिकला ट्रेड करत संघात घेतलं आहे. रविवारी सर्वत्र याबाबत गंधाळ उडाला होता. मात्र सोमवारी स्वतः हार्दिक आणि मुंबई इंडियन्सने याबाबत ऑफिशिअल अकाउंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यासोबतच आयपीएलनेही याबाबतीत पोस्ट सुद्धा केली आहे.

हार्दिक पंड्या याधीही मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. गुजरात संघाने त्याला आपल्या ताफ्यात घेत थेट कर्णधार केल होतं. पहिल्या सीझनमध्ये संघाला ट्रॉफी मिळवून दिलेली, दुसऱ्या पर्वामध्ये फायनलमध्ये धडक मारली होती. मुंबईने थेट कर्णधाराला ट्रेड करत आपल्या संघात परत एकदा घेतलं आहे. पलटणने कॅमेरून ग्रीनला आरसीबीला दिलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.