धक्कादायक; अज्ञात तरुणीचा मृतदेह मुंबईतील सी फेसवर आढळल्याने खळबळ

मुंबई खरंच महिलांसाठी सुरक्षित आहे का?

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईत पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. एका अज्ञात तरुणीचा मृतदेह मुंबईतील सी फेसवर आढळून आला आहे. एका गोणीत हा मृतदेह हात-पाय तुटलेल्या अवस्थेत आढळला असून, वरळी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत तरुणीचे वय अंदाजे १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळी सी फेसवर गोणीत तरुणीचा मृतदेह आढळून आला असून, तरुणीचं वय अंदाजे १८ ते ३० च्या दरम्यान असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तरुणीची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai) महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुलींच्या हत्या सातत्याने होत असून याला नेमक जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित राहत आहे. काही दिवसांपूर्वी परीक्षेला जाणाऱ्या तरुणीवर एका व्यक्तीकडून लोकलमध्ये तरुणीवर अत्याचार होतो, दुसरीकडे एका महिलेचा विनयभंग होतो, मीरा रोडवरील सरस्वती हत्याकांड, श्रद्धा वालकर प्रकरण, या सर्व प्रकारांमुळे मुंबई खरंच महिलांसाठी सुरक्षित आहे का? हा प्रश्न निर्माण होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.