मुक्ताईनगरात तीन दिवसापासून वीजपुरवठा खंडित…

0

 

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

शहरात गेल्या दोन-तीन दिवसापासून वीजपुरवठा खंडित असल्यामुळे व्यवसायिक दुकानदारांचे तसेच शेतकऱ्यांचे पेरणीचे दिवस असल्यामुळे वीज कनेक्शन पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे. त्यात रात्री वीज चालू बंद होत असल्यामुळे उपकरण जळण्याचे शक्यता वाढली आहे. यादरम्यान उकाडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शहरातील जनता हैराण झाली आहे.

दरम्यान काही वीज ग्राहकांनी मुक्ताईनगर मनसे तालुकाध्यक्ष मधुकर भोई यांना आपल्या समस्या सांगितल्या. त्यांनी रवींद्र पाटील, उत्तम जुमडे, मंगेश कोळी, गजानन पाटील, सुनील कोळी आदींसह सहाय्यक अभियंता कुंभार तालुका कार्यकारी अभियंता ढाके व सर्व वायरमन यांच्याकडे सरळ दिशेने शेतात डीपीवर तात्काळ वीज जोडणी व्हावी आणि मुक्ताईनगर शहरातील विजसुरळीत व्हावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना व प्रहार दिव्यांग क्रांती सेनातर्फे जुना मलकापूर रस्ता इथे डीपीच्या कामकाजाठिकाणी निवेदन देण्यात आले.

मुक्ताईनगर शहरातील वीजपुरवठा येत्या दोन तीन तासात सुरळीत करावी असं अध्यक्षांनी सांगितले, त्याचबरोबर मुक्ताईनगर तालुक्यातील खेड्यांमध्ये सुद्धा वीजपुरवठा खंडित केले जात आहे. ती पण सुरळीत करावी अशी मागणी केली. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळावर नाराज होणार नाही त्यासाठी काही तासात वीज सुरळीत करण्यासाठी मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई, प्रहार दिव्यांग सेनेचे तालुका अध्यक्ष उत्तम जुमडे यांनी लेखी निवेदन दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.