मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीला अपघात…

0

 

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटने चंद्रकांत पाटील यांच्या सहित काही जणांना किरकोळ जखम झाल्याचे वृत्त आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, आमदार चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगर येथे लग्नानिमित्त जात असताना कुंड गावाजवळ जुने कुंड रस्त्यावर त्यांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी क्रमांक MH19EA6018 ही समोरील वाहनावर (MH19DV0005) आदळल्याने हा अपघात झाला. या अपघातात ताफ्यातील पोलीस कर्मचारी एएसआय काझी, पो.कॉ. तोसिफ शेख, पो.कॉ.जवाहर पवार, गाडी चालक शब्बीर शेख यांना किरकोळ ईजा झाली आहे. तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांना सुध्दा किरकोळ ईजा झाल्याने ते उपचारासाठी जळगाव येथे रवाना झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.