रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, जाणून बुजून दुर्लक्ष..?

0

मोरगाव ता. रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

प्र.जि.मा. 17 नंबर हा रस्ता चोरवड ते दुसखेडा असा मार्ग आहे. हा मार्ग मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या चोरवड सीमेपासून अजनाड, मोरगाव बुद्रुक, मोरगाव खुर्द, खिरवड, पातोंडी व तसा अजंदे मार्गे जाऊन खिर्डी दुसखेडा जातो. रावेर यावल व भुसावल या तालुक्यांना जोडणारा हा प्रमुख मार्ग असून हा रस्ता नेहमीच अजनाड ते मोरगाव बुद्रुक व मोरगाव खुर्द असा हा रस्ता नेहमीच दुर्लक्षित आहे.

असे असताना गेल्या दहा वर्षापासून सदर रस्त्याचे दुरुस्तीचे काम झालेले नव्हते, परंतु आता सदरच्या रस्त्याचे दुरुस्तीचे काम चालू असून दोन्ही बाजूने साईड पट्टी खोदून त्यावर मुरूम व पिवळी माती टाकून पाणी मारून दबाई  करणे आवश्यक आहे. परंतु तसे न होता थातूरमातूर काम  केले जात आहे व त्या कामाकडे मुद्दाम संबंधित दुर्लक्ष करीत आहेत. या ठिकाणी संबंधित अभियंता यांनी लक्ष घालावे व संबंधित ठेकेदाराकडून चांगले काम करून मिळावे. अशी अपेक्षा सामान्य नागरिक करतांना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.