चालत्या दुचाकीने अचानक घेतला पेट

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

यावल ते फैजपुर मार्गावरील रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ अचानक ऍक्टिव्ह दुचाकीने दुपारी अचानक पेट घेतला. यात कुणालाही इजा झालेली नाही. या आगीत दुचाकी जळून खाक झाली आहे.

यावल तालुक्यात फैजपूर येथील रहिवाशी मनिषा संजय महाजन (वय ४०) या आपल्या ताब्यातील ऍक्टिव्ह दुचाकी क्रमांक (एमएच १९- ३२४९) ने सोमवारी १ एप्रिल रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास यावलकडून फैजपुर येथे जात असतांना सांगवी व हिंगोणा गावाजवळच्या असलेल्या सांगवी पॅट्रोल पंपाजवळच्या परिसरात रोडावर मोपेड दुचाकी ही अचानक बंद पडून जाम झाली.

त्यानंतर दुचाकीला बाजूला थांबवून रोडाच्या कडेला लावली. पाहणी करीत असतांना दुचाकीने अचानक पेट घेतला. त्यात संपुर्ण दुचाकी जळून खाक झाली. यावेळी जवळच असलेल्या रसवंती चालकाच्या मदतीने आग विझवण्यात आले. मात्र दुचाकी तोपर्यंत संपुर्ण जळून गेली.

Leave A Reply

Your email address will not be published.