दाम्पत्याला जंगलात नेवून लुटले; गुन्हा दाखल

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दाम्पत्याला सात ते आठ जणांनी जंगलात नेवून मारहाण करत विवाहितेच्या अंगावरील दागिने आणि रोकड असा एकुण ३७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जबरी लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसांनी सहा जणांना अटक केली आहे.

पंकज रामसिंग राठोड (वय २१, रा. जोंधनखेडा ता. मुक्ताईनगर) हा तरूण आपल्या पत्नी सपनासह वास्तव्याला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील माळेगाव शिवारातील कालिंका माता मंदीराच्या पुढे जवळ दाम्पत्य हे बुधवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रस्त्याने जात होते. त्यावेळी पती-पत्नी हे लघुशंकेसाठी थांबले.

यावेळी बहादू, तोरे, आणि प्रताप यांच्यासह इतर ७ अनोळखी इसम येवून दोन्ही पती-पत्नीला जंगलात नेवून बेदम मारहाण केली. तर पत्नी सपनाच्या आंगावरील दागिने  व बाराशे रूपयांची रोकड असा एकुण ३७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाला जबरी चोरून नेला आहे.

याप्रकरणी दाम्पत्याने मुक्ताईनगर पोलीसात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील सात संशयित आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here