खुशखबर.. MPSC मार्फत 340 जागांसाठी मोठी भरती

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खूशखबर आहे. होय. एमपीएससीने 340 नव्या जागांसाठी भरती काढली आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी (Deputy Collector), पोलीस अपअधीक्षक (Deputy Superintendent of Police), शिक्षणाधिकारी (Education Officer), तहसीलदार (Tehsildar) आणि सहायक गट विकास अधिकारी (Assistant Group Development Officer) यासह विविध पदांसाठी जागा आहेत.

11 मे 2022 रोजी एमपीएससीकडून 161 संवर्गाच्या भरतीकरीता जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्येच 340 नव्या पदांचा समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे आता एकूण 501 जागांवर भरती होणार आहे.

या जागांवर निघाली भरती

(1)उपजिल्हाधिकारी, गट अ- 33

(2)पोलीस उपअधीक्षक, गट अ- 41

(3)सहायक राज्यकर आयुक्त, गट अ- 47

(4) उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट अ- 14

(5) उपनिबंधक, सहकारी संस्था, गट अ- 2

(6) शिक्षणाधिकारी, गट अ- 20

(7) प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी), गट अ- 6

(8) तहसीलदार, गट अ- 25

(9) सहायक गट विकास अधिकारी, गट ब – 80

(10) उपअधीक्षक, भूमी अभिलेख, गट ब- 3

(11)सहायक निबंधक, सहकारी संस्था, गट ब – 2

(12) उपशिक्षणाधिकारी, गट ब- 25

(13) सहायक प्रकल्प अधिकारी, गट ब- 42

एकूण – 340

या तारखेला होणार परीक्षा

MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 ही 21 ऑगस्ट 2022 रोजी घेतली जाईल. या भरती परीक्षेद्वारे महाराष्ट्र राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये उमेदवारांची भरती केली जाईल. राज्यातील 37 जिल्हा केंद्रावर 21 ऑगस्ट रोजी परीक्षा होणार आहे.

कोण अर्ज करू शकतो ?

19 ते 38 वर्षे वयोगटातील उमेदवार या परीक्षांसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित वर्गाला उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल. जोपर्यंत शैक्षणिक पात्रतेचा संबंध आहे, पदवीधर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

अर्जाची फी किती ?

MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 साठी अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 544 रुपये शुल्क भरावे लागेल. तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना 344 रुपये शुल्क भरावे लागेल. सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.