आ. चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश ! मुक्ताईनगर मतदार संघातील शेत रस्त्यांची दशा पालटनार

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

मतदार संघातील शेती रस्त्यांची दशा पालटनार असून मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनेतून 12 रस्ते होणार आहेत. तब्बल 16 कि.मी. लांबीच्या या रस्त्यांच्या आराखड्याला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले असून प्रत्येकी 23.85 लक्ष निधी सह मंजूरी मिळाल्याने एकूण 12 रस्ते मंजूर झाल्याने सुमारे 2.87 कोटी निधी या योजनेच्या माध्यमातून आमदार चंद्रकांत पाटील यांनी शेती रस्त्यांसाठी खेचून आणल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे. तर मतदार संघातील आणखीन रस्ते प्रस्तावित असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्विय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली.

राज्य शासनाने गावातील शेत रस्ते तसेच पाणंद रस्ते करण्यासाठी पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजना सुरू केली होती. मात्र, या योजनेतही अनेक अडचणी येत होत्या, त्यात निधीचीही कमरता होती. यामुळे ही योजना अधिक कार्यक्षम आणि सुटसुटीत करून तिचे रूपांतर ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते’ असे करण्यात आले आहे. मनरेगा आणि राज्य रोहयो यामधून ही योजना राबविली जाणार आहे.

या रस्त्यांना मिळाळी मंजुरी :

१) मेळसांगवे ते खूपखेडा ता.मुक्ताईनगर येथील शेती रस्ता खडीकरण करणे.

२) कर्कि गट नं 20 ते कोठा ता.मुक्ताईनगर येथील शेती रस्ता खडीकरण करणे.

३) उचंदा शिवार ते काळीचा शेती रास्ता ता.मुक्ताईनगर येथील शेती रस्ता खडीकरण करणे.

४) पुरणाड ते शेमळदे ता.मुक्ताईनगर येथील शेती रस्ता खडीकरण करणे.

५) उमरा ते धुळे ता.मुक्ताईनगर येथील शेती रस्ता खडीकरण करणे.

६) चीचखेडा ते पारंबी ता.मुक्ताईनगर येथील शेती रस्ता खडीकरण करणे.

७) धुळे ते वढोदा ता.मुक्ताईनगर येथील शेती रस्ता खडीकरण करणे.

८) पारंबी ते राजुरा ता.मुक्ताईनगर येथील शेती रस्ता खडीकरण करणे.

९) कोचुर ते वाघोदा ता.रावेर येथील शेती रस्ता खडीकरण करणे.

१० ) खिर्डी ते जुना चांगदेव ता.रावेर येथील शेती रस्ता खडीकरण करणे.

११) भामलवाडी ते चांगदेव जाणारा रस्ता ता.रावेर येथील शेती रस्ता खडीकरण करणे.

१२) तरोडा ते तिघ्रा जाणारा रस्ता ता.मुक्ताईनगर येथील शेती रस्ता खडीकरण करणे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.