या तीन व्यक्तींना आहे जगात कोणत्याही देशात पासपोर्टशिवाय जाण्याची मुभा !

0

नवी दिल्ली ;- सुमारे २०० देश असलेल्या आणि जवळपास साडे सहा अब्ज लोकसंख्या असलेला या जगात केवळ तीन अशा व्यक्ती आहेत ज्यांना पासपोर्टशिवाय जगातील कुठल्याही देशात जाता येतं. त्यांच्यासाठी खास सवतलीची तशी व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यक्ती कुठल्याही देशात गेल्यावर त्यांना कुणीही पासपोर्टबाबत विचारत नाहीत. तसेच त्यांना विशेष वागणूक दिली जाते. तसेच प्रोटोकॉलनुसार पूर्ण सन्मानही दिला जातो.जगात पासपोर्ट प्रणाली लागू होऊन १०२ वर्षे उलटली आहेत. या प्रणालीमुळे कुठल्याही व्यक्तीला दुसऱ्या देशात जायचं असेल तर पासपोर्ट जवळ बाळगणे अनिवार्य बनले. अगदी, राष्ट्रपती, पंतप्रधान यांनांही परदेशात जाताना डिप्लोमॅटिक पासपोर्ट जवळ बाळगावा लागतो.

पासपोर्टशिवाय कुठल्याही जाण्याची विशेष मुभा ज्या तीन व्यक्तींना आहे. अशा खास तीन व्यक्ती म्हणजे ब्रिटनचे आणि जपानचे सम्राट आणि सम्राज्ञी. सध्याच्या काळात संपूर्ण जगामधून केवळ या तीनच व्यक्तींना ही परवानगी आहे. नुकतेच इंग्लंडचे राजे बनलेल्या चार्ल्स यांच्यापूर्वी हा विशेषाधिकार राणी एलिझाबेथ यांच्याकडे होता. ब्रिटनच्या राजांना असला तरी त्यांच्या पत्नीला हा विशेषाधिकार मिळत नाही. जेव्हा एलिझाबेथ ह्या राणी होत्या तेव्हा त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांना डिप्लोमॅटिक पासपोर्ट सोबत बाळगावा लागे.

दरम्यान, जपाचचे सम्राट आणि सम्राज्ञींनाही हा विशेषाधिकार मिळालेला आहे. सध्या जपानचे सम्राट नारुहितो आहेत तर त्यांची पत्नी मसाको ओवादा जपानच्या सम्राज्ञी आहेत. त्यापूर्वी त्यांचे वडील अकिहितो हे जपानचे सम्राट होते. त्यांनी २०१९ मध्ये निवृत्ती स्वीकारली. तोपर्यंत त्यांना पासपोर्टची गरज भासत नसे. मात्र आता त्यांना डिप्लोमॅटिक पासपोर्ट सोबत बाळगावा लागतो. जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने १९७१ मध्ये ही व्यवस्था सुरू केली आहे.

जगातील इतर देशांचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती जेव्हा एका देशातून दुसऱ्या देशात जातात. तेव्हा त्यांना डिप्लोमॅटिक पासपोर्ट सोबत बाळगावा लागतो. मात्र त्यांना ते ज्या देशात जातात, तेथील देशाकडून काही खास सवलती दिल्या जातात. त्यांना इमिग्रेशन ऑफिसरसमोर उभं राहावं लागत नाही. भारतामध्ये ही सवलत पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना दिली जाते.

भारताकडून तीन रंगांचे पासपोर्ट वितरित केले जातात. सर्वसामान्य व्यक्तींसाठी निळ्या रंगाचा, सरकारशी संबंधित उच्चाधिकारी आणि मंत्र्यांसाठी अधिकृत पासपोर्ट, तर डिप्लोमॅटिक पासपोर्ट तपकिरी रंगाचा असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.