MSME ला 3 लाख कोटीचं विना हमी कर्ज मिळणार : अर्थमंत्री

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी आपण अर्थव्यवस्था, इन्फ्रास्ट्रक्चर, सिस्टीम, डेमोग्राफी आणि डिमांड या पाच स्तंभांवर भारताला आत्मनिर्भर बनवू शकतो असे सांगितले होते. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज (13 मे) पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची सविस्तर माहिती दिली

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी MSME क्षेत्राला कोणत्याही गॅरंटीशिवाय ३ लाख कोटींचं कर्ज उपलब्ध होईल अशी घोषणा केली आहे.यामुळे MSME क्षेत्राला मोठा दिलासा दिला आहे.२० लाख कोटींचं पॅकेज करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध केंद्रीय मंत्र्यांशी, विविध तज्ज्ञांशी चर्चा केली अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेलं पॅकेज हे देशाच्या विकासासाठी जाहीर केलेलं पॅकेज आहे.

लँड, लेबर, लिक्विडिटीवर भर देणार

लोकल ब्रॅंड्सना ग्लोबल बनवणार

प्रदीर्घ चर्चेनंतर आत्मनिर्भर भारत पॅकेजचा अंतिम निर्णय

स्क्षूम, लघु, मध्यम कुटीर उद्योगांसाठी तीन लाख कोटीचे कर्ज; एक वर्ष कर्जाचा हप्ता भरण्याची गरज नाही.

२० लाख लघु व मध्यम उद्योगांना फायदा

१०० कोटीपर्यंतच्या लघु उद्योगांना कर्जामध्ये सवलत

अडचणीतल्या लघु-कुटीर उद्योगांसाठी २० हजार कोटींची तरतूद

लघु  मध्यम उद्योगांची व्याख्या बदलली

१० कोटींपर्यंत गुंतवणूक असणारे उद्योग लघु मानले जाणार

२०० कोटींपर्यंतचे सरकारी टेंडर आता सरकारी पातळीवर भरण्याची मुभा

जून, जुलै, ऑगस्टपर्यंत पीएफची २४टक्के रक्कम सरकार भरणार

पीएफसाठी २५०० कोटींची तरतूद

एनबीएफ (नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी) साठी ३० हजार कोटींची तरतूद

वीज वितरण कंपन्यांसाठी ९० हजार कोटी

सरकारी ठेकेदारांना ६ महिन्यांची सूट

टीडीएसच्या दरात २१ मार्च २०२१ पर्यंत २५ टक्के कपात

इन्कम  रिटर्न भरण्यास मुदतवाढ; ३० नोव्हेंबर २०२० असणार नवी अंतिम तारीख

संकटात सापडलेल्या MSME साठी 20 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे – अर्थमंत्री

MSME ला 3 लाख कोटी विना हमी कर्ज मिळणार : अर्थमंत्री

पगाराच्या 24 टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाणार, 15 हजार पेक्षा कमी पगार असणाऱ्यांना सरकारकडून दिलासा : अर्थमंत्री

रेशन कार्ड नसणाऱ्यांनाही धान्य मिळणार, ७१ हजार मेट्रीक टन डाळीचं वाटप करण्यात आलं : अर्थमंत्री

कृषी क्षेत्रात सुधारणा केली, आवाज योजना, उज्वला योजनाने फायदा करुन दिली, आयुष्मान योजनेने गरिबांना उपचारात मदत केली, देशात व्यवसाय करण्यात मदत झाली – अर्थमंत्री

 

Leave A Reply

Your email address will not be published.