रेल्वेच्या धडकेत तरसोद येथील प्रौढाचा मृत्यू

0

जळगाव : रेल्वेच्या धडक लागून विष्णु जुलाल पाटील (वय त ४८) , रा. तरसोद, ता. जळगाव) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवार दि. २८ जानेवारी रोजी तरसोद जवळील रेल्वे रुळावर घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील तरसोद येथे विष्णू पाटील हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. खासगी वाहनावर चालक म्हणून काम करुन कुटुंबाच उदनिर्वाह करीत होते. तरसोद गावाजवळ रेल्वे रुळावर खांबा क्रमांक ४२६/ २८ ते ४२७/०२ दरम्यान एका जणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची माहिती नशिराबाद पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी जावून मृतदेहाची ओळख पटवली असता हा मृतदेह तरसोद येथील विष्णु पाटील यांचा असल्याचे समजले. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.