विषारी द्रव्य प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

0

जळगाव: विषारी औषध सेवन केल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केलेल्या शायदा अहमद तडवी (वय ३०, रा. कुसुंबा, ता. जळगाव) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव तालुक्यातील कुसुंचा येथे शायदा अहमद तडवी या वास्तव्यास आहे. दि. २९ रोजी त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या कुटुंबियांनी सायंकाळच्या सुमारास त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले, याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना दि. ३० रोजी रात्रीच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली, याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी सीएमओ डॉ. नम्रता अच्छा यांनी दिलेल्या खबरीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.