भुसावळ फॅक्टरीच्या पिनाका प्रॉडक्शन केंद्रात चोरी

0

भुसावळः येथील आयुध निर्माणीच्या पिनाका प्रॉडक्शन केंद्रातून १ लाख २० हजार रुपये किमतीची केवल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २३ ते २६ डिसेंबर दरम्यान घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुध निर्माणी हे प्रतिबंधित क्षेत्र असतानाही तेथे चोरी झाली.

आयुध निर्माणीचे प्रदीप गोहिराम टेहलानी वांनी फिर्याद दिली आहे. आयुध निर्माणीत असलेल्या पिनाका प्रॉडक्शन केंद्रात असलेल्या वेल्डिंग मशीनची ९० हजार रुपये किमतीची वायर तसेच ३० हजार रुपये किमतीचे वेल्डिग मशीनचे दोन टॉर्च लांबवले, चोरट्यांनी प्रॉडक्शन केंद्राच्या खिडकीला लावलेले गज कापून आत प्रवेश केला व आतील साहित्वाची चोरी केली, रेल्वेच्या पीएच कारखान्यामध्ये कॉपर चोरीनंतर आता आयुध निर्माणीमध्येही चोरी झाल्यामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.