खा. नवनीत राणांच्या जीवाला धोका ? काय आहे निनावी पत्रात

0

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क 

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. काही संशयास्पद लोक राजस्थानच्या सीमेवरून अमरावतीत (Amaravati) आले आहेत. ते तुमच्या घरीदेखील येऊन गेले, त्यामुळे मी अल्लाहकडे तुमच्या सुखरुपतेची प्रार्थना करतो. तुम्हाला काहीही होऊ नये, असं वक्तव्य या पत्रातून करण्यात आलं आहे.  राणा यांच्या हितचिंतकाने त्यांना एका पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. मात्र आता त्यांच्या जीवाला धोका असल्याचं पत्र आल्यानं अमरावतीत खळबळ माजली आहे.

काय आहे पत्रात ?   

नमस्ते मॅडम,

मै आपको मेरा नाम नही बता सकता हुं। मै आपके ही शहर का एक आम नागरिक हुं. मै आपको आगाह करना चाहता हु की आप थोडा संभलकर रहीये, क्योंकी कुछ लोग आपकी पिछा कर रहे है। आपने मेरे बहोत कामें मे हेल्प कीयी है। मै एक गव्हर्मेंच सरवंट हुं। आपने मेरी ट्रान्सफर कर दिया था और मेरे फादर की कोरोना मे भी बहोत हेल्प किया है। मै आपको यही बताना चाहता हु की कुछ संदिग्ध लोग राजस्थान बॉर्डर से अमरावती आये है। और मुझे यह जानकारी मिली है की वह लोग आपके घर भी आकर गये है। मै अल्लाह से यही दुवा करुंगा की आप के साथ कुछ भी अनहोनी ना हो. और आप इसि तरह बडे से बडे पद पर जाये, ऐसी दुवा करता हुं।

खुदा हाफीस…

उमेश कोल्हे प्रकरण 

अमरावतीत 21 जून रोजी उमेश कोल्हे या मेडिकल स्टोअर चालवणाऱ्या व्यक्तीची हत्या झाली होती. भाजपाच्या नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ कोल्हे यांनी पोस्ट टाकली होती. त्यातील आरोपींना अटकही करण्यात आली होती. मात्र पोलीस हे प्रकरण दाबत असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. केंद्रीय तपास यंत्रणांकडून यासंबंधी चौकशी व्हावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली होती. तेव्हापासून त्यांना वारंवार धमक्या येत असल्याचंही नवनीत राणा यांनी सांगितलं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.