ब्रेकिंग; लोकसभेत गोंधळ घालणारे ३१ खासदार निलंबित

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

लोकसभेत कामकाज सुरु असताना गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर प्रचंड मोठी कारवाई करण्यात आली आहे. लोकसभेतील एकूण ३१ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. यातील अनेक खासदारांना संपूर्ण अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्षांनी ही सर्वात मोठी कारवाई केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी निलंबित केलेल्या खासदारांमध्ये अधीर रंजन चौधरी, टीआर बालू, दयानिधी मारन यांचा समावेश आहे.

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आजही अधिवेशनात गोंधळ पाहायला मिळाला. आजही सभागृहात प्रचंड गोंधळ झाल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी ३३ खासदारांना निलंबित केले आहे. लोकसभा अध्यक्षांच विरोधी पक्षाचे खासदार ऐकत नव्हते, त्यामुळे लोकसभा अध्यक्षांना कठोर पाऊल उचलावं लागलं आहे. शशुक्रवारीच १३ खासदारांना निलंबित करण्यात आलं होत. त्यानंतर आजही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

काँग्रेस नेत्यांचाही समावेश
लोकसभा अध्यक्षांनी ज्या खासदारांना निलंबित केलं आहे. त्यात काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचाही समावेश आहे. याशिवाय काँग्रेससह टीएमसी खासदारांनाही निलंबित करण्यात आलं आहे. दयानिधी मारन आणि सौगत राय यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. आज निलंबित करण्यात आलेल्या अनेक खासदारांची नावे समोर आली आहेत.

विशेष अवधीसाठी निलंबित

लोकसभेत झालेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले होते. विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. काही खासदार तर वेलमध्ये येउन गोंधळ घातलं होते. या सर्व खासदारांना संसदेच्या विशेष अवधीसाठी निलंबित करण्यात आले आहे.

कल्याण बॅनर्जी, ए राजा, दयानिधी मारन, अपरुप पोदार, प्रसून बॅनर्जी, ईटी मोहम्मद बशीर, जी सेल्वल्म, अन्नादुरई, टी सुमति, अधीर रंजन चौधरी, रवीस्वामी प्रेम चंद्रन, शताब्दी रॉय, सौगत रॉय, असीथ कुमार, कौशल कुमार, एंटो एंटोनी, पल्ली मणिकम, प्रतिभा मंडल, काकोली घोष, सुनील मंडल, के मुरलधरन आणि अमर सिंह आदी खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. आता पर्यंत निलंबित खासदारांची संख्या 47 झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.