ट्रकच्या धडकेत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या इसमाचा जागीच मृत्यू

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ शहरातील सिंधी कॉलनीमधील रहिवासी अशोक बखटमल बजाज (५२) हे मार्निंग वॉक करत असतांना त्यांना ट्रकने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवार (दि. ३१) रोजी सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान रेल्वेच्या उड्डाणपुलाजवळ घडली.

सविस्तर माहिती अशी की, अशोक बाबाज हे नेहमीप्रमाणे सकाळी पायी फिरायला निघाले असतांना ट्रकने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. अपघाताप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखले करण्यात आला आहे. ट्रक चालकास युनूस शहा, सजन शहा फकीर यास पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेनकोळी करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.