पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

दिनांक ३१ ऑक्टोबर भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच ‘हेलोवीन उत्सव ‘जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे उत्साहात साजरी करण्यात आली. भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाची माहिती जनसामान्यांना व्हावी या विचारातून ३१ ऑक्टोबर हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्यात येतो.

कार्यक्रमाची रूपरेषा व सूत्रसंचालन कु. प्रणव्या मेघनाथन व कु.आरव भारुडे या विद्यार्थ्यांनी केले.शाळेचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन व उपस्थित पालक प्रतिनिधी यांच्या हस्ते भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

प्राचार्य गोकुळ महाजन यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य संग्रामात दिमाखदार कामगिरी करीत असतांना त्यांनी प्राणांची परवा केली नाही. भारत छोडो आंदोलन सक्रीय सहभाग नोंदविला व तीनदा तुरुंगातही त्यांना जावे लागले.आपणही राष्ट्राला एकसंघ ठेवण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे असे मत मांडले. यावेळी त्यांनी पोदार शाळेच्या शिक्षक, विद्यार्थी,स्कूल बस कर्मचारी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांना राष्ट्रीय ऐक्य व भ्रष्टाचाराविरुद्ध शपथ दिली.

शाळेचे उपमुख्याध्यापक दिपक भावसार, पोदार जंबो किड्सच्या मुख्याध्यापिकाउमा वाघ, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थिती दर्शिविली होती

या पाठोपाठ ‘हेलोवीन उत्सव’ साजरा करण्यात आला. पाश्चात्य संस्कृतीनुसार ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा दिवस हेलोवीन उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मृतात्मे आपल्या थडग्याच्या बाहेर येतात असे मानले जाते. माणसांनी भुतांच्या वेशभूषां केल्या तर पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळते असाही समाज पाश्चात्य जगात आहे.

या प्रसंगी ई.४ थी च्या विद्यार्थ्यांनी भुतांच्या वेशात लघु नाटिका सादर केली. ‘‘भूतनाथ सह पार्टी’ या आशयाला अनुसरून भूतांची गम्मत आणि मस्करी केली. भूतांविषयी लहान मुलांमध्ये असलेली भीती घालविणे हाच यामागील उद्देश होता. नीरज पाटील या विद्यार्थ्याने हेलोवीन उत्सव का आणि कसा साजरा केला जातो याविषयी माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.