मोरगावजवळील रेल्वे बोगद्याखाली पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय

0

रेल्वे प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी

मोरगांव ता.रावेर

रावेर हून मोरगांव, नेहते, दोधे, खिरवड या गावांना तामसवाडी मार्गे जातानां सेंट्रल रेल्वेची मुंबईवरून दिल्लीकडे जाणारी व दिल्लीवरून मुंबईकडे येणारी रेल्वे लाईन आडवी आहे या ठिकाणी पूर्वीपासून एक रेल्वे गेट होते. आता त्या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने पूर्वीचे रेल्वे गेट बंद करून भुयारी मार्ग काढलेला आहे व त्यासाठी सिमेंट काँक्रीट चा एक भुयारी बोगदा तयार केलेला आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने त्या बोगद्यामध्ये जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याची सोया केली नसल्याने याठिकाणी प्रत्येक पावसाच्या पाण्यानंतर पाणी साचल्याने याठिकाणाहून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीला तोंड द्यावे लागत असून याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

या ठिकाणावरून येणारे जाणारे नागरिक तसेच पायी चालणारे नागरिक व वाहनधारक या सर्वांना या पाण्यामधून रात्री अपरात्री मार्ग काढतानां जिकरीचे होत आहे. या सर्व गोष्टींकडे पाहिल्यानंतर रेल्वे प्रशासनाने केलेल्या कृत्यामुळे नागरिकांची सोय होण्याऐवजी गैरसोय झालेली दिसून येत आहे. व या ठिकाणी असेच जर पाणी साचत राहिले तर खूप मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

यासंदर्भात रेल्वे विभागाचे अभियंता यांचे कार्यावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. व सुज्ञ नागरीक संबंधित अभियंत्याला दोष देतानां दिसून येत आहे. रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी तात्काळ कार्यवाही करावी. अन्यथा नागरिकांना या ठिकाणी आंदोलन करावे लागेल असा सूर जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांमधून निघत होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.