खाद्यसंस्कृती विशेष
आपले आरोग्य आपल्या खानपानावर अवलंबून असते. तसेच सकाळची न्याहारी पौष्टिक पदार्थाने झाली असेल तर अतिशय चांगले. म्हणून आज आपण झटपट बनणारे कुरकुरीत पौष्टीक मुगाचे डोसे कसे बनवायची ते पाहुयात..
साहित्य:
२ वाटी मुगाची डाळ (हिरवी सालासकट)
आले छोटा तुकडा
३/४ हिरवी मिरची
६-७ पाकळ्या लसुण
१/२ चमचा जिरे
मीठ – चवीनुसार
कृती:
१) डाळ ५ ते ६ तास पाण्यात भिजवुन घ्यावी रात्रभर ठेवली तरी चालेल.
२) मग त्यातले पाणी काढुन मिक्सरमध्ये वाटुन घ्यावी. वाट्ताना त्यात आले, मिरची, लसुण व जिरे घाला.
३) वाटताना थोडे थोडे पाणी घालून पीठ डोशाला करतो त्याप्रमाणे पातळ करावे.
४) चवीनुसार मीठ घालुन अर्धातास ठेऊन द्यावे.
४) नॉनस्टीक पॅनला थोडे तेल टिश्युपेपरने लावुन घ्या आणि डोसा तव्यावर घालून घ्यावे.
५) डोसा दोन्ही बाजुने परतुन घ्यावा आणि टोमॅटो सॉस, खोबऱ्याची चटणी किंवा लिंबाच्या लोणच्याबरोबर खायला घ्यावा.
अपर्णा स्वप्निल कांबळे – नांगरे
पत्रकार/फुड ब्लॉगर
९८९२१३८१३२