मोठी बातमी ! पहिलं स्वदेशी मंकीपॉक्स टेस्ट किट लाँच

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशात कोरोना (Corona)  विषाणूच्या पाठोपाठ मंकीपॉक्स (Monkeypox)  या आजाराने देखील डोकं वर काढलं आहे. मंकीपॉक्स विषाणूची (Monkeypox Virus) ओळख पटण्यासाठी आधी प्रयोगशाळेत नमुने पाठवावे लागत होते. मात्र, आता यासाठी सोपा मार्ग सापडला आहे.

पहिलं स्वदेशी किट लाँच 

पहिलं स्वदेशी मंकीपॉक्स टेस्ट किट लाँच करण्यात आलं आहे. ट्रांसएशिया एर्बा मंकीपॉक्स आरटी पीसीआर किट (Monkeypox RT-PCR) अतिशय संवेदनशील असून हाताळायला फार सोपं आहे. त्यामुळे आता मंकीपॉक्स विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांचा अहवाल लवकर येऊन त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यास मदत होणार आहे.

केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार अजयकुमार सुद (Ajay Kumar Sood) यांच्या हस्ते पहिलं स्वदेशी मंकीपॉक्स आरटीपीसीआर किट लाँच करण्यात आलं आहे. ट्रांसएशिया एर्बा मेडिकल्स (Transasia Biomedicals)या फार्मा कंपनीनं हे मंकीपॉक्स आरटीपीसीआर किट (RT-PCR) तयार केलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय अलर्ट 

देशात मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रकरणांमुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय अलर्ट मोडवर आलं आहे. यानंतर आता केंद्र सरकारकडून पहिलं भारतीय मंकीपॉक्स टेस्ट किट लाँच करण्यात आलं आहे. आंध्र प्रदेशातील मेडटेक झोन (AMTZ) येथे शुक्रवारी 18 ऑगस्ट रोजी हे किट लाँच करण्यात आलं आहे. त्यामुळे आता मंकीपॉक्स विषाणू संसर्ग झालेल्यांचं निदान होणं सोपं होणार आहे. त्यामुळे रुग्णांना वेळी उपचार मिळून मृत्यूचा धोकाही कमी होईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.