१० लाखांसाठी डॉक्टर पतीकडून पत्नीचा छळ

0

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

माहेरहून १० लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेला मारहाण करून छळ केल्याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील माहेर आलेल्या हेमांगी अमोल झाकरे (गुजर) यांचा विवाह सुरत येथील डॉ. अमोल दत्तात्रय झाकरे यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले. त्यानंतर पती अमोल याने दवाखानासाठी माहेरहून १० लाख रूपये आणावे अशी मागणी केली.

पैसे आणले नाही म्हणून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करून छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती डॉ. अमोल झांकरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार शशिकांत पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.