स्कूलबसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; जीवे मारण्याची धमकी…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शाळा सुटल्यावर घरी जात असतांना मुंबईत चालत्या स्कूलबसमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तसेच या घटनेची माहिती कोणाला दिल्यास जिवेमारण्याची धमकी या पीडित मुलीला आरोपी बस चालकाकडून देण्यात आली होती.

गुरूवारी पीडित मुलगी ही ऐरोली, नवी मुंबई येथील शाळेतून स्कूलबसने घरी परतत असतांना, चालत्या बसमध्ये आरोपीने मुलीला चुकीचा स्पर्श केला. तसेच याबाबत कुणालाही न सांगण्यासही त्याने धमकावले. घरी परतल्यानंतर मुलीने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती तिच्या कुटुंबियांना दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या पालकांनी या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. सूरज भालेराव असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी सूरज भालेराववर ३५४, ५०६ भा द वी कलमांसह ८,१२ पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.