२६ रोजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंची पारोळ्यात सभा…

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

दि. २६ नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे पारोळ्यात विविध विकास कामांच्या भुमीपुजनासाठी येणार असल्याची माहिती शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा शहरातील आ. चिमणराव पाटील यांच्या विकास निधीतून विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत या सर्व विकास कामांचा भुमीपुजन सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

यात प्रामुख्याने शहरातील पाणी पुरवठा योजना आहे जी ५३.७० कोटींची योजना आहे, तसेच शहरात अद्यावत नाट्यगृहाचे बांधकाम जे १५ कोटी रुपयांचे आहे, त्याचबरोबर पारोळा शहरात जलतरण तलाव इमारतीसह  २.५० कोटी रुपयांचे आहे, तसेच पारोळा शहरातील नगर परिषद हद्दीतील विविध चौकाचे सुशोभीकरणे  २.५० कोटी रुपयांचे आहे. या सर्व विकास कामांचा भुमीपुजन सोहळा मुख्यमंत्री यांच्या हस्ते शनिवार दि २६ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. तसेच याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पारोळा शिंदे गटाकडून देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.