दरवाजा उघडा ठेऊन झोपणे पडले महागात ; महागडा मोबाईल लांबविला

0

जळगाव ;- शहरातील खोटे नगरच्या पाण्याच्या टॉकीजवळील एका घरातून दरवाजा उघड ठेऊन घरातील हॉलमध्ये झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने २० हजार रुपयांचा मोबाईल लांबविल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहार .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , संदीप श्रावण साबळे वय ४१ हे नोकरी करतात. त्यांच्या खोटे नगरजवळील पाण्या टाकीनजीक असणाऱ्या घरात ते २ रोजी घराचा दरवाजा उघड ठेऊन झोपलेले असताना अज्ञात चोरट्यानेत्यांच्या उशी जवळ असलेला २० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला . याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला संदीप साबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपस पोहेकॉ गुलाब माळी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.