माजी मंत्री व कित्तूरचे माजी आमदार डी.बी. इनामदार यांचे निधन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

माजी मंत्री व कित्तूरचे (Kittoor) माजी आमदार डी.बी. इनामदार (MLA D.B. inamdar) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. १० मे रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर 13 मे रोजी निकाल लागणार आहे. मात्र, असं असतानाच माजी मंत्री व कित्तूरचे माजी आमदार डी.बी. इनामदार (वय 74) यांचे आज मंगळवार दि. 25 रोजी निधन झालं. दीर्घकाळापासून फुफ्फुस आणि यकृत समस्यांनी ते त्रस्त होते. त्यांच्यावर बेंगळूरच्या मणिपाल इस्पितळात (Manipal Hospital Bangalore) उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा स्वास घेतला.

 

उद्या बुधवार दि. 26 रोजी दुपारी 2 वाजता त्यांचे मुळ गाव नेगिनहाळ इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. आज पर्यंत ते 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.