पाचोऱ्यात बी.एस.एन.एल कर्मचार्‍यांचे धरणे आंदोलन

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

 

सेवानिवृत्त बी.एस.एन.एल (BSNL) कर्मचार्‍यांच्या प्रलंबीत विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया बी.एस.एन.एल डॉट पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने पाचोरा रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या बी.एस.एन.एल च्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांसाठी सेवानिवृत्त बी‌.एस.एन.एल कर्मचार्‍यांनी जोरदार निदर्शने केली. संघटनेचे अध्यक्ष एम.एस.पाटील व सचिव विलास संदनशिव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या धरणे आंदोलनात एस.आर.पाटील, भिमसिंग पाटील, एल. बी. कुलकर्णी, नामदेव पाटील, जिवराम पाटील, पांडूरंग धनवडे, संतोष वाघ, सुधाकर दवणे, शेख सलीम, शेख ईबा, शेख अल्लाउद्दीन, कैलास पाटील, अशोक शिंदे, कोमलसिंग पाटील जेष्ठ सहकारी सननसे आदी सेवानिवृत्त बी.एस.एन.एल. कर्मचारी सहभागी झाले होते. केंद्र व राज्य सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणामुळे पेन्शनर्सचे भविष्यातील जीवन धोक्यात आले आहे. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, त्यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी सरकारने दखल घेऊन सेवानिवृत्त बी.एस.एन.एल. कर्मचार्‍यांचे प्रश्‍न सोडविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. बीएसएनएल कर्मचार्‍यांनी प्रलंबीत मागण्यांसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर धरणे आंदोलन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.