करमाड येथून चाळीस वर्षीय इसम बेपत्ता

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा तालुक्यातील करमाड बु. येथील विनोद बापू मोरे (वय ४०) हे दिनांक २९ नोव्हेंबर रोजी मी बाहेर जाऊन फिरून येतो असे सांगून गेले असता रात्री अकरा वाजेपर्यंत घरी आले नाही म्हणून २ डिसेंबर रोजी पारोळा पोलीस ठाण्यात पत्नी सोनाली विनोद मोरे यांनी माहिती दिल्यावरून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

त्याच्या नातेवाईकांकडे व आजूबाजूच्या परिसरात तपास केला असता ते मिळून आले नाही. पाच फूट सात इंच उंची, रंग सावळा, नाक सरळ, चेहरा लांब, दाढी मोठी, अंगात पांढऱ्या रंगाचे शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट असे त्यांचे वर्णन आहे.

सदर व्यक्ती आढळून आल्यास पारोळा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पारोळा पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी केले आहे. याप्रकरणी पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विजय भोई करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.