लेवा पाटीदार समाजाचा विश्वविस्तरीय महामेळावा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव येथील लेवा नवयुवक संघाने दि.०४ डिसेंबर २०२२ रोजी विश्वस्तरीय विवाहच्छुक वधु वर महामेळाव्याचे आयोजन एम. जे. कॉलेजमागे जळगाव येथे केले आहे.

विवाहच्छुक वधु वराची परिचय पुस्तिका याठिकाणी उपलब्ध राहणार असुन यात विवाहेच्छुक वर ३०५५ विवाहेच्छुक वधु १८२७ ही संख्या आहे. या महामेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन मोरगाव लेवा- पंचायतचे कुटुंबनायक रमेश विठु पाटील, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, खा. रक्षाताई खडसे, आ. राजुमामा भोळे, आ. शिरीष मधुकर चौधरी, माजी खा. डॉ. उल्हास पाटील, महापौर जयश्री महाजन, डॉ. अर्जुन भंगाळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सर्वसाधारण परिस्थीतील विकसनशील कुटूंबातील कष्टकरी शेतमजुर ते असामान्य परिस्थितील विकसीत कुटुंबातील उच्चविदयाविभुषित याचाही परीचय याठिकाणी एकाच व्यासपिठावर होणार आहे.

सर्व समाजबांधवासाठी जेवण, चहा, मिनरल वॉटरची सुविधा लेवा नवयुवक संघाने या ठिकाणी केलेली आहे. तरी विवाहेच्छुक समाज बांधवांनी या महामेळाव्यास उपस्थिती दयावी, असे आवाहन लेवा नवयुवक संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.