३४ वर्षीय तरूण सहा दिवसांपासून बेपत्ता

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

यावल शहरातील फालक नगरातून ३४ वर्षीय तरूण घरात काहीही न सांगता बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. मोहम्मद चांद शरीफ पटेल रा. फालक नगर, यावल असे हरविलेल्या तरूणाचे नाव आहे.

मोहम्मद चांद शरीफ पटेल हा आपल्या पत्नी व कुटुंबियांसह राहतात. सोमवारी २५ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घरात काहीही न सांगता तो बेपत्ता झाला आहे. रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने पत्नी रेश्मा चांद पटेल यांनी सर्वत्र त्यांचा शोध घेतला परंतू कुठेही शोध न लागल्याने त्यांनी सहा दिवसांनतर शुक्रवारी १ जुलै रोजी यावल पोलीस घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईका महेंद्र ठाकरे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.