धक्कादायक.. गुंगीचे औषध देत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह राहते. गावातील संशयित आरोपी साबीर शेख जहूर (वय २६) याची अल्पवयीन मुलीशी ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेवून १ ऑगस्ट २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ दरम्यान अल्पवयीन मुलीला साबीर शेख हा त्याच्या घरी बोलावून पाण्यात गुंगीचे औषध देवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. हा प्रकार सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीने आपल्या नातेवाईकांसह एमआयडीसी पोलीसात धाव घेतली.

सदर अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून शुक्रवार २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी संशयित आरोपी साबीर शेख जहूर याच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.