धक्कादायक; एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत आढळला कुजलेला मृतदेह…

0

 

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

तालुक्यातील दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत हायवे ट्रॅप नजीक एका शेतात कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळल्याने मलकापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, आज दि. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार च्या सुमारास एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हायवे ट्रॅप पोलीस चौकीच्या शेजारी 100 मीटर अंतरावर एक गुरे चारणाऱ्या गुराख्याला  अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला, त्या गुराख्याने जवळ असणाऱ्या हायवे पोलीस चौकीत पोलिसांना माहिती दिली. व हायवे पोलीसांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती दिली तात्काळ एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पोहोचत मृतदेहाचा पंचनामा करून, तो मृतदेह मलकापूर उपजिल्हा रुग्णालय हलविला.

एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद महाजन यांनी जनतेला मृतदेहाची ओळख पटविण्याचा आवाहन केले आहे. सदर मृत देहाच्या अंगावर पांढरी जीन्स पॅन्ट असून, त्या मृतदेहाची उंची साधारणतः अंदाजे साडेपाच फूट, रंग गोरा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.