Saturday, January 28, 2023

ओझर येथील २५ वर्षीय मजुर बेपत्ता

- Advertisement -

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

तालुक्यातील ओझर येथील २५ वर्षीय मजुर दि. १८ सप्टेंबर पासुन गावातुन बेपत्ता झाल्याची घटना घडली असुन, बेपत्ता झालेल्या इसमाच्या पत्नीच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये मिसिंग दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ओझर ता. पाचोरा येथील रहिवाशी दिपक चंदु गायकवाड (२५) दि. १८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास किराणा दुकानात जाऊन येतो असे सांगुन घरातुन निघाले होते. मात्र दोन दिवस उलटुनही दिपक हा घरी न परतल्याने त्याची पत्नी कविता दिपक गायकवाड यांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत पती दिपक चंदु गायकवाड याची बेपत्ता झाल्याची नोंद दाखल केली आहे.

बेपत्ता झालेल्या दिपक गायकवाडची उंची ५ फुट ७ इंच, रंग सावळा, केस लांब, शरीराने मजबुत, अंगात फिकट गुलाबी रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, पायात लाल रंगाची सॅन्डल, उजव्या हाताच्या मनगटावर ओम असे गोंधलेले असून, दिपक गायकवाड याचा शोध पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना सुर्यकांत नाईक हे घेत आहेत.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे