एमआयडीसीतून इलेकट्रीक साहित्य चोरणाऱ्याला अटक

0

जळगाव ;- एमआयडीसीतील एस-सेक्टरमधील प्रांजल इंडस्ट्रीज प्लॅस्टिक कंपनीतून ३६ हजार ५०० रुपये किमतीचे ईलक्ट्रीक मोटार व साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली . एमआयडीसी पोलीसस् टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय सिताराम प्रजापती (वय-३३ रा. रायपूर कुसुंबा ता.जि. जळगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

एमआयडीसी परिसरातील सेक्टर-एस मधील प्रांजल इंडस्ट्रीज प्लास्टिक दाना प्लांट कंपनीच्या मोकळ्या जागेतून संशयित आरोपी विजय प्रजापती याने १६ जून रोजी सकाळी १० वाजता १८ हजार रुपये किमतीची मोटार, प्लास्टीक कटर करणारे लहान व मोठे कटर असा एकुण ३६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनीतील प्रमोद मराठे यांनी एमआयडीसी पोलीस रविवारी १८ जून रोजी दुपारीतक्रार देण्यात आली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अल्ताफ पठाण करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.