लोकशाही न्यूज नेटवर्क
बंगालच्या उपसागरातील ‘मिचॉन्ग’ चकरीवादळामुळे राज्यात पावसाळा पोषक हवामान होत आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता असून, मंगळवारी (दि.५) पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
नैऋत्य अरबी समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. यातच बंगालच्या उपसागरातील ‘मिगजौम’ चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टी व लगतच्या राज्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातही दिसून येत आहे. राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान झाले आहे.
विदर्भ, मराठवाड्यात पावसाळा पोषक हवामान होत असून, मंगळवारी विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, जिल्ह्यात विजांसह पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.