लोकशाही न्यूज नेटवर्क
पतीने स्टीलच्या झाऱ्याने आणि लाथा बुक्क्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजीत हि घटना घडली आहे. प्रियांका (वय २८) असं खून झालेल्या विवाहितेचे नाव असून याप्रकरणी पती संदीप विरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी पाटील एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप आणि त्याची पती प्रियांका यांच्या काही कारणावरून वाद सुरु होता. यातून संतापलेल्या संदीपने प्रियंकाला स्टीलच्या झाऱ्याने मारहाण करायला सुरुवात केली. यात प्रियंका जखमी गंभीर जखमी झाली. मात्र आरोपीने तेवढ्यावरच न थांबता तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यातच प्रियंकाचा मृत्यू झाला. त्यानंतर एमआयडीसी वाळूज पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपीला अटक केली आहे.