लोकशाही माध्यम समूहनिर्मित मतदार जागृती गीताला प्रतिसाद..!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

देशातील लोकसभा निवडणुकांसाठी प्रचार रणधुमाळी सुरू आहे. लोकहित मतदानाच्या हक्क पजावणे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे. मतदानाचा हक्क जास्तीत जास्त लोकांनी बघायला पाहिजे मतदानाची टक्केवारी वाढवणे हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण समजले जाते. तथापि आपल्या राज्यात देशात मतदानाची टक्केवारी पाहिजे त्या प्रमाणात वाढत नाही. त्यासाठी प्रशासन स्तरावर विविध प्रकारचे प्रयत्न होताना दिसतात. याचाच एक भाग म्हणून दैनिक लोकशाही माध्यम समूहाच्या वतीने मतदारांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी “चला हो मतदान करू चला..” या सुरेल गीताच्या चालीत सचित्र असे गीत सादर करून सामान्यांपासून ते असमान्यांपर्यंत, रिक्षावाल्यापासून टॅक्सी ड्रायव्हर पर्यंत, शेतकरी, मजूर, हमाल, मापाडी, अपंग, वयोवृत्त, तरुणांनी मतदानाचा हक्क बजाविला पाहिजे आणि प्रत्यक्षपणे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्याचे फोटोग्राफ घेऊन उत्सहा वाढवीला पाहिजे. गीत सादरीकरणामुळे हे गीत पाहणारे आणि ऐकणाऱ्यांचा मतदार करण्याचा उत्साह वाढवणार आहे. दैनिक लोकशाही माध्यम समूहाच्या वतीने संचालक राजेश यावलकर यांनी त्या गीताची निर्मिती विनामूल्य करून ते जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे सुपूर्त केले. “चला हो मतदान करू चला..” या गीताच्या निर्मितीसाठी सहाय्यक प्रांताधिकारी प्रमोद हिले, नशिराबादचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांचे हे गीत असून नायब तहसीलदार प्राजक्ता केदार यांनी हे गीत गायले आहे. गीताचे बोल कवी मनोहर आंधळे यांचे आहेत, तर त्याला संगीत आप्पा नेवे यांनी दिले आहे. दैनिक लोकशाही माध्यम समूहाच्या डिजिटल विभागामार्फत संचालक राजेश यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे मतदार जागृती गीत सुरेख असे तयार झाले आहे. त्या गीताच्या निर्मितीसाठी जे काही आर्थिक बोजा आहे, तो कर्तव्याच्या भूमिकेतून उचलला आहे. या जनजागृती गीताच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढण्यात मदत झाली तर एक पवित्र कार्य लोकशाही माध्यम समूहाने केले, याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया संचालक राजेश यावलकर यांनी व्यक्त केली आहे. जळगाव सारख्या ठिकाणी गीताची निर्मिती, त्याचे सुरेख असे चित्रकरण होऊ शकते, हेच जाणू लोकशाही माध्यम समूहाचे वैशिष्ट्य होय. मुद्रित वृत्तपत्र माध्यमातून डिजिटल माध्यम सुद्धा सक्षमपणे राबविले जात आहे. यासाठी रेकॉर्डिंगसाठी जो स्टुडिओ निर्माण करण्यात आला आहे, तो सुद्धा तांत्रिकदृष्ट्या सक्षम स्टुडिओ जळगाव सारख्या ठिकाणी माध्यम समूहात लक्षवेधी असा म्हणता येईल. त्यासाठी लागणारी इन्व्हेस्टमेंट आणि तज्ञ असा स्टाफ सुद्धा लोकशाही माध्यम समूहाने उपलब्ध केला आहे.

 

“चला हो मतदान करू चला..” या मतदार जनजागृती गीताचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण गीत हे स्थानिक स्तरावर निर्माण केलेले आहे. यासाठी गीताचे बोल स्थानिक कवी चाळीसगावचे मनोहर आंधळे यांनी लिहिले आहे. तर या गीताला स्थानिक संगीतकार आप्पा नेवे यांनी संगीत दिले आहे. नायब तहसीलदार प्राजक्ता सोनवणे यांनी हे गीत गायले आहे. महसूल प्रशासनातील अधिकारी यांस असलेल्या प्राजक्ता सोनवणे या चांगल्या गायिका आहेत, हे या निमित्ताने कळले. प्राजक्ता सोनवणे यांच्यातील कलागुण या निमित्ताने सर्वांना कळले. सर्व स्थानिक कलावंतांना घेऊन लोकशाही माध्यम समूहाने निर्णय घेतलेल्या निर्माण केलेल्या गीताचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. ही लोकशाही माध्यम समूहासाठी अभिमानाची बाब म्हणावी लागेल. हे सर्व करण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रोत्साहन दिले नसते, तर कदाचित हे मतदार जनजागृती गीताची निर्मिती झाली नसती. परंतु खऱ्या जोहरीला सोन्याची पारख असते असे म्हणतात, ते खरे आहे. मूळ पत्रकारिता पिंड असलेले तरुण तडफदार आणि उत्साही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे नेहमी नव्याच्या शोधात असतात प्रशासनातर्फे मतदार जनजागृती करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. परंतु संगीताच्या सुरेल तालात मतदार जनजागृती गीताने मतदार जागृती होऊन थोड्याफार मतदानाचे टक्केवारी वाढली तर त्याला “चला हो मतदान करू चला..” या गीताचा सुद्धा खारीचा वाटा निर्माण झाला, आणि यश पदरी पडले असेच म्हणता येईल…!

Leave A Reply

Your email address will not be published.