शिरागड येथील श्री सप्तशृंगी मातेच्या यात्रोत्सवला सुरुवात…

0

 

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

मनवेल, ता. यावल येथुन जवळच असलेल्या शिरागड येथील निवासिनी श्री सप्तशृंगी देवीच्या यात्रेला १८ एप्रिल पासून सूरुवात झाली आहे. या यात्रेची २३ एप्रिल रोजी सांगता पौणिमेला होईल. या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन ,भारुड ,वही गायन,हवन, पुजा.पाठ सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले आहे. कोळन्हावी व शिरागड दोन्ही गावाच्या तापीनदीच्या उंच टेकडीवर श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे हे लहान गड म्हृणून ओळखले.

दर्शनासाठी रस्त्याची सोय

कोळन्हावी गावातून व धामणगाव फाटा येथून तुरखेडा गावातून सप्तश्रुगी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जाता येणार आहे, तर यावल आगारातून साकळी मनवेल मार्गे शिरागड बसने गावातुन थेट गडापर्यंत रस्ता आहे.

भावीकांनी श्री सप्तश्रुगी मातेचे दर्शन शांततेत घ्यावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष योगराज सोळुंके, सचिव प्रताप सोनवणे, सरपंच योगिता सोनवणे, सुधाकर सोळंके, शांताराम सोळंके व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.